Google सपोर्ट सेवा (GSS) अॅप तुम्हाला पर्सनलाइझ सपोर्ट अनुभवासाठी Google ग्राहक साहाय्य एजंटसह तुमची Android डिव्हाइस स्क्रीन शेअर करण्याची अनुमती देतो. तुमच्या डिव्हाइसवरील GSS ने एजंट तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर करण्यासाठी आमंत्रित करू शकतो आणि तुमची समस्या जलद आणि सहजरीत्या सोडवण्यासाठी स्क्रीनवरील टिपांनी मार्गदर्शन करू शकतो. तुमची स्क्रीन शेअर करत असताना, एजंट तुमचे डिव्हाइस नियंत्रित करू शकणार नाही, परंतु त्यांच्या सूचना स्पष्ट करण्यास मदत करण्यासाठी तुमची स्क्रीन पाहू शकेल. तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करणे कधीही थांबवू शकता किंवा विराम घेऊ शकता.
हे अॅप Pixel डिव्हाइस आणि Android 7.1.1 किंवा उच्च आवृत्तीच्या Nexus डिव्हाइसवर आधीपासून इन्स्टॉल केलेल्या स्वरुपात येते; हे Android 5.0 किंवा उच्च आवृत्ती असलेल्या बर्याच डिव्हाइसवर इन्स्टॉल करता येऊ शकते. हे अॅप स्वत:हून सुरू करता येऊ शकणार नाही आणि ते तेव्हाच वापरता येऊ शकेल जेव्हा Google ग्राहक साहाय्य एजंट त्यांची स्क्रीन शेअर करण्यासाठी वापरकर्त्याला एक आमंत्रण पाठवेल.